शाश्वत पुजा

श्री दत्त मंदिर संस्थानामध्ये रु ५५५१ जमा करून वर्षातील एक दिवस भाविक श्री दत्तमहाराजांच्या पादुकेस अभिषेक ,ब्राह्मणभोजन, गोशाळेचा एक दिवसाचा गोग्रास व त्यादिवशीची अन्नछत्राची सेवा भाविकांना तहहयात करता येईल भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा

नाव नोदंणीसाठी संपर्क ९४२२०७०३१३

धर्मप्रभा

* वैचारिक आंदोलनाच्या विस्तारासाठी . . .
* धर्मप्रभाच्या शक्तीदायी विचारांचे आकलन करून घेण्यासाठी . . .
* भारतीय जीवनमुल्ये आणि संस्कृतीची अनुभूती घेण्यासाठी . . .

सदस्यत्वासाठी संपर्क ९८३४५१८६१८

 
दत्त जयंती
गुरू पोर्णिमा
महाशिवरात्री
 

नियोजित दत्त मंदीर

श्री दत्तमहाराजांच्या कृपेने व पूज्यश्रींना झालेल्या प्रेरणेतून श्रीक्षेत्र रुईभर येथे श्री दत्तमहाराजांचे अति भव्य व अतिशय सुंदर मंदिर साकारत आहे. श्री दत्तमंदिराचे संपूर्ण बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अतिशय नाजूक कोरीव कलाकुसर आहे . मंदिराचे भव्य सभागृह १०५ x ७० चौ. फुटांचे असून , गर्भगृह ५ मी. x ५ मी. आकाराचे आहे.गर्भागृहाबाहेरील प्रदक्षिणेचा मार्ग ४५ x ५० चौ.फुटांचा असून गर्भागृहावरील संपूर्ण शिखर राजस्थानातून मागविलेल्या डोलपुरी (लाल) दगडात अतिशय कोरीव रेखीव तयार होत असून शिखराची उंची ५१ फुटाचे आहे. भाविकांकडून श्री दत्तमहाराजांच्या चरणी अर्पण होत असलेल्या स्वेच्छा - सेवेतून अल्पावधीतच श्री दत्त मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण होत आहे.

मंदिरात येणाऱ्या भाविकांना जप, तप, साधना, ध्यानधारणा करण्यासाठी २७ x ९ चौरसफुटांचे ध्यान मंदिर आहे. मंदिरात १६० x ५५ चौरस फुटांचे बहुउद्देशीय सभागृहाचे काम प्रगतीपथावर आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्या निवासासाठी ५५ x ६० चौरसफुटांचे " भक्त निवास " भाविकांच्या सेवेत सुसज्ज झालेला असून या " भक्त निवासाचे " नियोजित बांधकाम ५ मजल्यांचे आहे.